Latest Posts

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मुलांना व नाशिक येथे मुलींना सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या प्रशिक्षणाकरीता www.spiaurangabad.com आणि नाशिक येथील मुलींच्या प्रशिक्षणाकरीता www.girlspinashik.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ४५० रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा २० एप्रिल रोजी विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या संबंधीत माहितीसाठी संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss