विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संघलोक सेवा आयोग (युपीएससी) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे २० जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक १३ जानेवारी २०२५ ला मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune (DSW) यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६४) कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व पशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
