विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : अनुसुचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीचे जे विद्यार्थी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी क्यूएस वर्ड रॅन्कींग 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा ४० विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेश शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विकास विभागाच्या ७ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून परीपूर्ण प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावा. तसेच https://swayam.mahaonline.gov.inयावर नोंदणी करावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी कळविले आहे.
