विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : महामार्गावर बेफाम वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे. निश्चित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवली जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याला चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने राज्यभरात तब्बल १८७ ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणता येणार आहे. तसेच नियम धाब्यावर बसवून गाड्या चालवणाऱ्यांवर सहजपणे कारवाई करणे शक्य होणार आहे.
राज्यातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून त्याच वेगाने अपघातही वाढले आहेत. तसेच मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवली जात असल्याने सर्वाधिक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिवहन विभागाने त्याची गंभीर दखल घेतली असून वाहनांच्या वेगाला लगाम लावण्यासाठी १८७ स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल मार्चअखेर तैनात केल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी जवळपास ५७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून तो केंद्र सरकारच्या स्कीम फॉर स्पेशल असिस्टंस टु स्टेट फॉर पॅपिटल इन्व्हेस्टमेंटअंतर्गत केला जाणार आहे. सदर स्पीड गन पॅमेरा स्टेंट्रल कंट्रोल रूमला जोडला जाणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. त्यामुळे ज्या ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल तैनात केली जाईल तेथून निधारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांना गाड्यांची माहिती कंट्रोल रूमला तत्काळ जाणार असून त्या वाहनाला दंडाचा दणका बसणार आहे.
कॅमेरे चुकवणाऱ्यांचा बंदोबस्त होणार –
सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक, पुणे-कोल्हापूर महामार्गावर ठिकठिकाणी स्पीड गन कॅमेरे लावले आहेत, मात्र सदरचे कॅमेरे कुठे आहेत याची माहिती वाहनधारकांना झालेली आहे. त्यामुळे अनेकजण सदर कॅमेऱ्याच्या टप्प्यात पोहोचताच अनेकजण आपल्या गाडीचा वेग कमी करतात, मात्र स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल कोणत्याही वेळी महामार्गावर तैनात करणे शक्य आहे. त्यामुळे कॅमेरे चुकवून वाऱ्याच्या वेगाने वाहने चालवणाऱ्यांचा बंदोबस्त होणार आहे.
