– ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ०५ जानेवारी पर्यंत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील गोशाळांना आर्थीक दृष्टया सक्षम करण्याकरीता सन २०२४-२५ पासुन गो शाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना ५० रु. प्रती दिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबविण्यास शासन मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्हयातील गो संगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत. त्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ०५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सदर योजनेचे उददेश व स्वरुप, अनुदाना पात्रतेच्या अटी व शर्ती योजनेची अंमलबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इ. सविस्तर माहीती www.mahagosevaayog.org व http://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे- १६ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५, गोसेवा आयोगमार्फत प्राप्त अर्जाची प्राथमीकत पासणी- ०६ जानेवारी २०२५ ते १० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती व्दारा प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी- ११ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनांची संख्या आयोग कार्यालयास कळवीणे- २१ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ तरी जिल्हयातील इच्छुक गोशाळा यांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास डॉ. विलास अ. गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.
