Latest Posts

जीसीसी व टीबीसी ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जीसीसी-टीबीसी डिसेंबर २०२४ मधील परीक्षा ९ ते २४ डिसेंबर  या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल ४ फेब्रुवारी ला ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल वि‌द्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या सर्केतस्थळावर उपलब्ध होईल. वि‌द्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल. वि‌द्यार्थ्यांची प्रमाणपत्रे गूणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात येतील.

प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम (GSM) कागदावर करुन वि‌द्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधीत वि‌द्यार्थ्यास सॉप्टकॉपी PDF स्वरुपात देण्यात यावी. जेणे करुन वि‌द्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम (GSM) कागदावर छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधीत विद्यार्थ्यास प्रमाणपत्र/गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी. निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

गुणपडताळणीसाठी प्रति विषय १०० रुपये प्रमाणे व छायाप्रतीसाठी मिळण्यासाठी प्रति विषय ४०० रूपये प्रमाणे रक्कम ऑनलाईन पध्दतीने १३ फेबुवारीपर्यंत भरण्यात यावेत. गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुर्न-मुल्यांकनासाठी प्रती विषय ६०० रुपयेप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss