विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर शहरात गांजा विक्री करीता आलेल्या एका युवकाला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक करीत त्याच्या जवळून १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई ५ जानेवारी रात्री १०.१५ वाजता केली.
चंद्रपूर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक रविवार, ५ जानेवारीला शहरात रात्री गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम नेहरू विद्यालय घुटकाळा वॉर्ड चंद्रपूर जवळ येथे गांजा विक्री करीत आहे. त्यावरून शहर गुन्हे शोध पथकांनी सापळा रचत आरोपी आबीद उर्फ आबुदाना अन्वर शेख (३८) रा. घुटकाळा वॉर्ड चंद्रपूर याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून १ किलो ८० ग्राम गांजा हस्तगत केले. पोलीसांनी आरोपी आबीद उर्फ आबुदाना अन्वर शेख याचा विरुध्द अमली पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८(क), २० (ब)(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बाच्छिरे, पोलीस हवालदार सचिन बोरकर, हवालदार संतोषकुमार कनकम, पोअं इर्शाद खान,विक्रम मेश्राम, इम्रान खान, रूपेश रणदिवे यांनी केले.
