Latest Posts

गडचिरोली पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ : शारीरिक चाचणीची गुणपत्रिका यादी जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली(Gadchiroli) : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ साठी शारीरिक चाचणीची प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे.

११ फेब्रुवारी रोजी चालक पोलीस शिपाई पदाकरिता घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीच्या गुणपत्रिका यादी गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर ([www.gadchirolipolice.gov.in](http://www.gadchirolipolice.gov.in)) तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे प्रकाशित करण्यात आली आहे.

तसेच, दररोज होणाऱ्या शारीरिक चाचणीच्या गुणपत्रिका यादी दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना या यादीमध्ये आपले नाव आणि संबंधित माहिती तपासून पुढील प्रक्रियेसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss