Latest Posts

जी.डी.सी अँड ए आणि ए व सी.एच.एम परीक्षेसाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सहकार विभगांतर्गत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी अँड ए आणि ए व सी.एच.एम परीक्षा २३ ते २५ मे ला घेण्यात येणार आहेत. चालू वर्षात परीक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अप्लीकेशन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेकरीता अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

इच्छूकांना परीक्षेचे ऑनलाईन अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत  सहकार विभागाच्या  https://gdca.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर  ऑनलाईन अर्ज भरता येईल. परिक्षार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाबाबत अधिक माहिती https://sahakarayukta.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरतांना तयार केलेला स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड परिक्षार्थींनी परीक्षेचा निकाल प्रसिध्द होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करुन ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss