Latest Posts

दुर्गम भागातील डॉक्टरांना २३ वर्षांपासून पदोन्नती नाही : आरोग्य विभागातील सावळा गोंधळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राज्याच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आरोग्य खात्यातील दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गातील डॉक्टरांची प्रतीक्षा यादी अद्याप प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे या डॉक्टरांची गेल्या २३ वर्षांपासून पदोन्नती अडली आहे.

शेवटच्या नागरिकांपर्यंत अविरत आरोग्यसेवा देण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी गट ब करतात. त्यात बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा, सर्पदंश, आकस्मिक सेवा, गरजेनुसार शवविच्छेदन, प्रसूती. यासोबतच लसीकरण, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना आदींचे नियोजन हेच डॉक्टर करतात. परंतु, पदोन्नतीबाबत याच डॉक्टरांवर अन्याय होत आहे. पदोन्नतीचा लाभ न घेताही अनेक डॉक्टर सेवानिवृत्त झाले आहेत. ३०० जुने व ७०० नवीन असे सुमारे १ हजार वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आजही आहेत. शासनाने तातडीने या डॉक्टरांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करून पदोन्नतीचा लाभ द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा वैद्यकीय अधिकारी महासंघाने दिला आहे.

प्रधान सचिव यांच्या आदेश नुसार आयुक्त यानी कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांची आंतरिम सेवा जेष्ठत्ता यादी प्रसिद्ध करणे बाबत २०२२ रोजी सादर केली आहे. शासन स्तरावर अंतरीम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत प्रक्रिया एक वर्षांपासून प्रलंबित होती. सदर नस्ती वर २९ नोव्हेंबर २३ रोजी प्रधान सचिव यांनी मान्यता दिली आहे. तरी देखील यादी तत्काळ प्रसिद्ध केली नाही.

वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या वैद्यकीय अधिकारी गट अ म्हणून पदोन्नतीबाबतचा प्रस्ताव जून महिन्यातच राज्यातील सर्व उपसंचालक कार्यालयातून शासनाकडे आला. परंतु, सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर अन्याय होत आहे सेवा जेष्ठत्ता यादीस मा. आयुक्त व प्रधान सचिव यांनी मान्यता दिली आहे तसेंच यादी आंतरिम आहे. अंतिम नाही असे असून देखील सेवा जेष्ठता यादी का प्रसिद्ध केली जात नाही ही बाब आश्चर्यकारकव निराशाजनक आहे. न्याय हक्क साठी राज्यभर आंदोलन करावे असे चित्र निर्माण झाले आहे. – डॉ. अरुण कोळी, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ व डॉ. नारायण करेवार सचिव शाखा गडचिरोली

Latest Posts

Don't Miss