विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी नितेश बाबुराव शेंडे यांची काही दिवसा पासून प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्या परिवाराला अडचण भासत होती. येथील स्मिथ शेंडे- विकास शेंडे- प्रमोद शेंडे- अश्विन कोटरंगे- कुमार गुरनुले या युवकांनी आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन त्या परिवाराची अडचण सांगितले आहे.
त्यांची अडचण पाहून वेळेची विलंब ना करता नितेश शेंडे यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यावेळी युवकांना अजयभाऊंनी सांगितले की, अजून औषध उपचारासाठी अडचण भासला तर मला सांगण्यात यावी म्हणून त्या युवकांना सांगितले आहे. युवकांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी जि.प. सदस्य सुनीता कूसनाके, माजी सभापती सुरेखा आलम, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, लक्ष्मण आत्रामसह आविसं – काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेंडे परिवाराचे नातेवाईक उपस्थित होते.
