विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील ग्रामपंचायत किस्टापुर (दो) अंतर्गत येत असलेल्या दोडगिर येथील रहिवासी संतोष सम्मा वेलादी यांना डोळ्याचा त्रास असल्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने डोळ्याच्या ऑपरेशनकरण्याकरिता जाण्यासाठी व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अडचण भासत होती.
ही अडचण आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना देचलीपेठा दौऱ्यावर असतांना त्यांचे नातेवाईक व स्वतः आजारी असलेले संतोष वेलादि यांनी आपली समस्या सांगताच अजय कंकडालवार यांनी रुग्णांस अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे बोलावून संपुर्ण उपचारकरिता आर्थिक मदत केली.
त्यावेळी अजय कंकडालवार यांनी नातेवाईकांना सांगितले की, पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी. वेलादी परिवारातील सदस्यांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक, नरेश गर्गम, सन्नी वेलादि, संमा वेलादी, प्रकाश दुर्गे, कुमार गुरनुले सह आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
