विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पूराडा, ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील वनपाल नरेंद्र सिताराम तोकलवार, पद-वनपाल (५७) (वर्ग-३) उपक्षेत्र कोहका, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पूराडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली यांना २० हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने आज रंगेहात पकडले.
तक्रारदार यांचे ट्रॅक्टर असून ते घरकूल बांधकामाकरीता शासकिय रॉयल्टीसह रेती वाहतुक करीत असतांना यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे ट्रॅक्टर पकडून त्यांचे ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला व पूढे सुरळितपणे रेती वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चालु देणेकरीता २४ जानेवारी २०२५ रोजी पडताळणी केली असता, आलोसे नरेंद्र सिताराम तोकलवार, पद-वनपाल, उपक्षेत्र कोहका, यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायद्या करीता वाम व भ्रष्ट मार्गाने पंच साक्षीदारासमक्ष २५ हजार रूपयांची सुस्पष्ट मागणी केली असल्याने तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड व टिम यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे ट्रॅक्टर घरकूल बांधकामाकरीता शासकिय रॉयल्टीसह रेती वाहतुक करीत असतांना यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे ट्रॅक्टर पकडून त्याचे ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला व पूढे सुरळितपणे रेती वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चालु देणेकरीता करीता २५ हजार रू. लाच रक्कमेची पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी करून तडजोडीअंती २० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य करून, लाच रक्कम स्विकारतांना मौजा पुराडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाजवळ रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे, पूराडा, जिल्हा-गडचिरोली येथे अप.क्र.०६/२०२५ कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व अटक करण्यात आली. आरोपी नरेंद्र सिताराम तोकलवार, पद-वनपाल, यांचे शासकीय वसाहत पुराडा येथील घराची अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चमु कडून झडती घेण्यात आली तसेच त्यांचे मुळ घर चंद्रपुर येथील महाराष्ट्र बँकेच्या मागे दे.गो. तुकुम चंद्रपुर येथील गुळ घराची घर झडती अॅन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपुर चमू कडुन घेण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, पो.नि. संतोष पाटिल, सफौ/सुनिल पेद्दीवार , पोहवा/शंकर डांगे, पोहवा/राजेश पद्मगिरीवार, पोहवा/किशोर जौजांरकर, नापोशि/स्वप्नील बांबोळे, पो.अं. संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके, हितेश जेट्टीवार, मपोशि/विद्या म्हशाखेत्री, मपोशि/ज्योत्सना वसाके व चापोहवा/राजेश्वर कुमरे, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
