Latest Posts

राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करित आहे. युवांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे व त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्याचे युवा धोरण अंतर्गत राज्य युवा पुरस्कार देण्यात येत असून सन २०२३-२४ राज्य युवा पुरस्कारासाठी १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारत घेण्यात येणार आहे. सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागास्तर नुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप युवक व युवती यांना ५० हजार रुपये व संस्थेस १ लक्ष रुपये रोख तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असणार आहे.

अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा व युवती विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss