Latest Posts

दिव्यांग योजनेसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सन २०२४-२५ या सत्रासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादित यांच्याकडून सुरू आहे. या अनुषंगाने या योजनेसाठी ६ फेब्रुवारी ला सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी पोर्टल २२ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्जासाठी https://register.mshfdc. s://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक ६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss