विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ भंडारा (Bhandara) : भंडारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत AgriStack हा प्रकल्प संपूर्ण देशामध्ये राबविणे बाबत कृषी विभागाने १४ ऑक्टोबर २०२४ ला शासन निर्णय पारित केला आहे. त्या अनुषंगाने सर्व शेतकरी जनतेला AgriStack संकल्पनेच्या शेतकरी ओळख क्रमांक (FARMER ID) निर्मिती प्रक्रियेस गतीमान करण्यासाठी शासनाच्या AgriStack सुकानु समितीने ०९ जानेवारी २०२५ रोजीच्या बैठकीमध्ये संपुर्ण राज्यात नागरी सुविधा केंद्राची मदत घेवून शेतकरी ओळख क्रमांक निर्मीतीचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याकरीता https://mhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर आपण स्वतः आपले शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रक्रीया ऑनलाईन करावी. सदर प्रक्रीयेत काही तांत्रिक अडचणी आल्यास …जवळच्या सी.एस.सी. केंद्र किंवा ग्रामपंचायत सी. एस. सी. केंद्रावर तसेच तहसिल कार्यालय,भंडारा येथे जाऊ शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकरी ओळखपत्र व्दारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतक-यांना त्वरीत मिळण्याकरीता सर्व शेतक-यांनी स्वतः यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार विनीता लांजेवार यांनी केलेले आहे.
