विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी ६ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांगाचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करुन सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार व कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी https://register.mshfdc.co.in यापोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे महाराष्ट्र राज्य अपंग व विकास महामंडळाने कळविले आहे.
