विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांच्यावर अवलंबित असलेल्यांनी www.mahasainik.maharshtra.gov.inया संकेत स्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
सदर संकेतस्थळावर नोंदणी करुन त्याची प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावी. जेणेकरुन माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात येणारे लाभ देणे सोईचे होईल, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.
