विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरातील बी टी एस प्लॉट चौकात एका ट्रक ने वृध्द महिला ला धडक दिल्याने ती महिला जागीच ठार झाल्याची घटना २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. मीराबाई असे मृतक महीलाचे नाव आहे.
माहितीनुसार, मीराबाई ही इकबाल सिंग सोनी यांचा सॉ मिल राहत होती. ती गोरक्षण वॉर्ड येथे लोकांचा घरी जाऊन मागून खात होती. काल ती बीटीएस प्लॉट चौकात गेली असता रोड पार करीत असताना एम एच ३१ बी वी ९१०४ चा चालकाने दारूच्या नशेत वाहन चालवून वृध्द महिला मीराबाई ला धडक दिली. त्यात ती उसळून रोड चा बाजूला पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला.
फिर्यादी विशाल बबन गेडाम यांच्या तक्रारी वरून बल्लारपूर पोलीसांनी ट्रक चालक गुरूविंदर सिंग चरण सिंग येटी (२७) रा. बीटीएस प्लॉट, बल्लारपूर याचा वर कलम १०६(१), २८१ बी एन एस, १३४, १८४, १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहे.
