विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे, नागपूर विभागाने मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्यांचे संचालन जाहीर केले आहे. या विशेष गाड्या प्रवाशांसाठी अतिरिक्त प्रवास सुविधा पुरवतील तसेच उन्हाळी गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.
1. गाडी क्रमांक 02139/02140 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर -छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई द्वि साप्ताहिक विशेष गाडी (50 सेवा)
ट्रेन नं. 02139 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- नागपूर विशेष एक्सप्रेस मुंबईहून 06 एप्रिल 025 ते 29 मे 2025 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि रविवार, 00:20 वाजता सुटेल आणि नागपूर आगमन 15:30 वाजता होईल.
ट्रेन नं. 02140 नागपुर- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष एक्सप्रेस नागपूरहून 06 एप्रिल 025 ते 29 मे 2025 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि रविवार, 20:00 वाजता सुटेल आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आगमन दुसऱ्या दिवशी 13:30 वाजता होईल.
डब्यांची रचना : 1 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 05 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 10 स्लीपर, 4 सामान्य (जनरल) आणि 2 लगेज सह गार्ड ब्रेक व्हॅन सह एकूण 22 कोच असतील.
2. गाडी क्रमांक 01469/01470 पुणे– नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (24 सेवा)
ट्रेन नं. 01469 पुणे- नागपूर विशेष एक्सप्रेस पुण्याहून 06 एप्रिल 025 ते 29 मे 2025 पर्यंत आठवड्यातून एक दिवस मंगलवारला, 15:50 वाजता सुटेल आणि नागपूर आगमन 06:30 वाजता होईल.
ट्रेन नं. 01469 नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस नागपुरहून 06 एप्रिल 025 ते 29 मे 2025 पर्यंत आठवड्यातून एक दिवस बुधवारला, 08.00 वाजता सुटेल आणि नागपूर आगमन त्याच दिवशी 23:30 वाजता होईल.
डब्यांची रचना: 03 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 15 तृतीय श्रेणी वातानुकूलित, आणि 2 लगेज सह गार्ड ब्रेक व्हॅन सह एकूण 20 कोच असतील.
3. गाडी क्रमांक 01467/01468 पुणे- नागपूर- पुणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (24 सेवा)
ट्रेन नं. 01467 पुणे- नागपूर विशेष एक्सप्रेस पुण्याहून 09 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 पर्यंत आठवड्यातून एक दिवस बुधवारला, 15 :50 वाजता सुटेल आणि नागपूर आगमन दुसऱ्या दिवशी 06:30 वाजता होईल.
ट्रेन नं. 01468 नागपूर- पुणे विशेष एक्सप्रेस नागपुरहून 10 एप्रिल 2025 ते 26 जून 2025 पर्यंत आठवड्यातून एक दिवस, गुरुवारला, 08.00 वाजता सुटेल आणि नागपूर आगमन त्याच दिवशी 23:30 वाजता होईल.
डब्यांची रचना : 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित,1 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 02 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 05 स्लीपर, 6 सामान्य (जनरल), आणि 2 लगेज सह गार्ड ब्रेक व्हॅन सह एकूण 17 कोच असतील.
आरक्षण या विशेष गाड्यांसाठी तिकिटांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष भाड्यात उपलब्ध आहे.
या गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक व थांबे जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक ती काळजी घेण्याची विनंती करते आणि रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट तसेच हेल्पलाईन क्रमांकाद्वारे गाड्यांच्या हालचालीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करते.
