ड्राय डे च्या दिवशी अवैद्य दारू सह स्विफ्ट डिझायर जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : स्थानिक गुन्हे शाखेने ड्राय डे च्या दिवशी कारवाई करत अवैद्य दारू सह स्विफ्ट डिझायर सहित ३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.
आज २६ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. वरोरा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट डिजायर गाडी मध्ये अवैध्यरित्या देशी दारु वाहतूक करुन विक्री करिता नेत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन वरोरा वरून नागपुर कडे जाणाऱ्या रोडवरील खालसा धाबा खांबाडा समोर नाकाबंदी केली असता स्विफ्ट डिजायर गाडीचा चालक गाडी न थांबविता थोड्या समोर जाऊन रोडच्या कडेला लावून पळून गेला.सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनामधे देशी दारू किंमत ९८ हजार रुपयांचा तसेच स्विफ्ट डिजायर गाडी किंमत ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आले.
आरोपी विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अपराध क्रमांक ४७/२०२५ कलम ६५ (अ), ८३ म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले.
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, सफौ. स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, पो.हवा. नितीन कुरेकार, दिपक डोंगरे, दिनेश अराडे पोअं. प्रशांत नागोसे, शशांक बदामवार, गोपीनाथ नरोटे यांनी केले.
