– जिल्हा व्यवस्थापक महामंडळ विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात १०,जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. याचे स्तरावरुन गुरु आहे.
योजनेचा उद्देश –
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे,
दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे,
या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी पोर्टल २२ जानेवारी २०२५ ला प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आली आहे. https:// register. mahidc.cu.in हि लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ०६. फेब्रुवारी,२०२५ पर्यत सायकाळी ६.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सदर योजनेचा लाभ जास्ती जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या,भंडारा विभागानी कळविले आहे.
