Latest Posts

जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंमलबजावणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : या प्रकल्पाचे उद्दिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. दुग्ध उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना विविध अनुदानाचा लाभ मिळणर आहे: उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या दुधाळ जनावरांवर ५०% अनुदान. भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या उच्च उत्पादनक्षम कालवडींवर ७५% अनुदान. पशुप्रजनन पूरक खाद्य आणि दुधातील फॅट व एसएनएफ वाढवणाऱ्या खाद्यावर २५% अनुदान. बहुवार्षिक चारा पिकांसाठी १००% अनुदान. मुरघास खरेदीसाठी प्रति किलो ३ रुपये अनुदान. विद्युत कडबाकुट्टी यंत्रावर ५०% अनुदान. वंधत्व निवारण व आधुनिक प्रशिक्षण सुविधा विनामूल्य.

इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज WWW.VMDDP.COM या स्थळावर जाऊन करावा किंवा संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय भंडारा डॉ. विलास गाडगे आणि जिल्ह्याचे विदर्भ व मराठवडा दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. दीपक पोतारेडडी मदिकुंटावार यांनी  केले आहे.

आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे –

पात्रता: पशुपालकाकडे किमान दोन दुधाळ जनावरे असावीत आणि त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी आवश्यक आहे.

नोंदणी: इच्छूक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

कागदपत्रे: आधार कार्ड, सात-बारा, रेशनकार्ड, दुग्ध उत्पादन प्रमाणपत्र, नोंदणीकृत जनावरांचे टॅग क्रमांक, बँकेचे खाते पुस्तक इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

Latest Posts

Don't Miss