Latest Posts

दिव्यांग व ६५ वर्षांवरील नागरिकांना मिळणार सहायक उपकरण

-२७, २८ व २९ मार्च रोजी प्राथमिक तपासणी शिबीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनीधी / चंद्रपूर (Chandrpur) :  भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या माध्यमातून वरोरा व राजुरा येथे दिव्यांग व ६५ वर्षांवरील व्यक्तिंचे प्राथमिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सीएमपीडीआय यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून दिव्यांग व ६५ वर्षावरील वृद्ध व्यक्तींसाठी लागणारे सहाय्यक उपकरण वितरण करण्याकरिता २७ व २८ मार्च २०२५ रोजी महारोगी सेवा समिती परिसर, आनंदवन, ता. वरोरा येथे तर २९ मार्च रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व ज्यु. कॉलेज राजुरा येथे सकाळी ११ ते ‍दुपारी ४ या वेळेत प्राथमिक तपासणी शिबीर होणार आहे. सदर शिबिरामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व ६५ वर्षावरील वृद्ध व्यक्तिंनी नमुद कागदपत्रे घेवून सहभागी

व्हावे.लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत : १. किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असलेले यु.डी.आय.डी. दिव्यांग प्रमाणपत्र. २. आधार कार्ड (जन्म तारीख नोंद असलेले) ३. उत्पन्न दाखला (सरपंच/ तलाठी/ तहसिलदार यांनी दिलेला) ४. राशन कार्ड ५. मोबाईल क्रमांक

Latest Posts

Don't Miss