Latest Posts

दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत पशुपालकांसाठी विविध योजना

– पशुपालकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यामध्ये सन २०२५ – २०२६ ते २०२८-२०२९ या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत पशुपालकांना ५० टक्के अनुदानावर उच्च दुध उत्पादन क्षमता असलेली १ गाय किंवा म्हैसचे वितरण, ७५ टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणाचे प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप, २५ टक्के अनुदानावर प्रजनन व पुरक खाद्य पुरवठा, २५  टक्के अनुदानावर फॅट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा, ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप,१०० टक्के अनुदानावर बहुवार्षिक चारा पिके, थोंबे वाटप,२५ टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सुरेंद्र पराते यांच्या ९६६५४४०४९६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss