Latest Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ५ महिन्यांनी वाढवला

– एकूण ११ महिन्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधीस मान्यता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, यांचे शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, ०९ जुलै २०२४ अन्वये, शासनाने सन २०२४-२५ पासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यास मान्यता दिलेली आहे. उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे हा या योजनेचा उददेश आहे. त्याअनूषंगाने, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हयातील विविध शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापनांमध्ये (६ महिने) कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी रूजू झालेले आहेत.

आता, सदर कालावधीमध्ये शासनाने शासन निर्णय क्र.कौविउ-२०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२, १० मार्च २०२५ अन्वये कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ५ महिन्यांनी वाढवुन एकूण कालावधी ११ महिने करण्यासा मान्यता दिलेली आहे. प्रस्तूत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रूजू झाल्याच्या दिनांकापासून ११ महिने असा असेल. तसेच, त्या उमेदवारांचा ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झालेला आहे, अशा उमेदवारांना पुढील ५ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत पुन्हा रूजू होता येईल. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रूजू झाल्याच्या दिनांकापासून ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनूज्ञेय असेल. उमेदवारांना ३० एप्रिल २०२५ पुर्वी संबंधित आस्थापनेत पुन्हा रूजू होता येईल. त्यानंतर उमेदवारांना रूजू होता येणार नाही, याची गंभीर दखल घ्यावी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार याअगोदर ज्या आस्थापनेत रूजू झालेले आहेत, तेच उमेदवार पुन्हा त्याच आस्थापनेत रूजू करून घ्यायचे आहेत. नविन प्रशिक्षणार्थी कोणत्याही परिस्थितीत रूजू करून घ्यायचे नाहीत, याची दक्षता घ्यावी.

सद्यस्थितीत www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांचा कालावधी हा ११ महिने करणेबाबत व इतर अनूषंगिक बाबी अद्यावत करणेबाबत तांत्रिक पथकाकडून कार्यवाही सुरू असून लवकरच Rejoin हा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना रूजू करून घेता येईल. तरी, उमेदवारांना ३० एप्रिल २०२५ पुर्वी संबंधित आस्थापनेत रूजू होणेबाबत अवगत करावे, असे आवाहन डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ५ महिन्यांनी वाढवला, एकूण ११ महिन्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधीस मान्यता भंडारा  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, यांचे शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, ०९ जुलै २०२४ अन्वये, शासनाने सन २०२४-२५ पासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, राबविण्यास मान्यता दिलेली आहे. उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे हा या योजनेचा उददेश आहे. त्याअनूषंगाने, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हयातील विविध शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापनांमध्ये (६ महिने) कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी रूजू झालेले आहेत.

Don't Miss