Latest Posts

चंद्रपुरात वाईन बार व देशी दारू भट्टीत चोर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरातील एका वाईन बार व देशी दारू मध्ये चोरी झाली असून ३२ हजार रुपये वर चोरांनी लंपास केले.

येथील महाकाली मंदिर परिसरातील नंदकुमार गुलाबराव लहामागे यांच्या त्रिवेणी वाईन बार मध्ये ४ – ५ मार्चला रात्री अज्ञात चोराने मागच्या किचन दरवाजाचा कुलूप फोडून आत मध्ये प्रवेश करून काउंटर मध्ये ठेवलेले १२ हजार रुपये तसेच बाजूच्या देशी दारू ठेवणाचा खोली मधील काउंटर मधुन २० हजार रुपये असे मिळून ३२ हजार रुपये चोरून नेले.

वाईन बार मालक नंदकुमार गुलाबराव लहामागे यांच्या तक्रारी वरून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरा विरुध्द कलम ३३१(४) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन बोरकर करीत आहे.

Latest Posts

Don't Miss