Latest Posts

चंद्रपूर जिल्ह्यात ४८ तासात दुसऱ्या वाघाचे मृत्यू : ताडोबा बफरमधील शिवनी वनपरिक्षेत्रातील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनच्या शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचा जखमी बछडा मृतावस्थेत आढळला. सदर घटना सोमवारी २० जानेवारी ला दुपारी उघडकीस आली. व्याघ्र मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून रेल्वेच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी समोर आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी ही व्याघ्र मृत्यूची नोंद झाली आहे.

ताडोबा बफर मधील शिवनी वनपरिक्षेत्राच्या पांगडी नियतक्षेत्रात दीड वर्षीय नर वाघ वनकर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. या भागात एक वाघीण आपल्या ४ बछड्यांसह वावरत होती. या भागात दोन मोठे वाघ असून झुंजीत त्यातील एका वाघाकडून दोन आठवड्यांपूर्वी वाघिणीचा सदर बछडा जखमी झाला होता. त्यामुळे त्या जखमी बछड्यावर ताडोबा बफर विभागाकडून नियमित देखरेख ठेवली जात होती. त्यानंतर जागेवरच त्याच्यावर उपचार केले गेले होते पण तो तग धरू शकला नाही. संध्याकाळ झाल्याने मृत वाघाचे शवविच्छेदन मंगळवारी, २१ जानेवारी ला चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला  केले जाणार आहे.

बछड्याचे सर्व अवयव शाबूत असून हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्गावरील सिंदेवाही व आलेवाही स्थानका दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती त्यानंतर ४८ तासातील हा दुसरा वाघ मृत्यू ठरला आहे. देशात मागील १९ दिवसात एकूण १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात हा महाराष्ट्रातील ९ वा वाघ मृत्यू ठरला आहे. यातील सर्व मृत्यू हे विदर्भातील जंगलात झाले आहेत हे विशेष.

मृत्यू नैसर्गिक –

शिवणी परिक्षेत्रात दीड वर्षाचा वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला.तो जखमी होता त्याचेवर जागीच उपचार केले गेले होते.त्याचे सर्व अवयव शाबूत आहेत, म्हणून हा नैसर्गिक मृत्यू आहे. असे पियुशा जगताप उप संचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी म्हंटले आहे.

Latest Posts

Don't Miss