विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : चंद्रपूर बायपास मार्गावर दुपारी २ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, अपघातानंतर कार चालक घटनस्थळावरून पसार झाला. महेंद्र मुसळे (४४), महेश नगर, तुकुम चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
आज दुपारी दुचाकी चालक महेंद्र मुसळे हे आपल्या दुचाकी क्रं एम एच ३४ जी ६१९७ ने चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते. त्यावेळी जुनोना मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने कार चालकाने वाहन विरुद्ध दिशेने टाकले, अतिवेगात असलेल्या चारचाकी वाहनाने आधी मार्गावर उभ्या असलेल्या स्कुल बस ला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित कार दुचाकी ला धडकली, धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला, या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. रामनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
