विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकियवसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तरशिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने २६ डिसेंबर २०२४ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सन २०२४-२५या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना वसतीगृह व स्वाधार योजनेचे अर्ज करणेकरिता https://hmas.mahait.org ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जावून नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगईनवर अग्रेशित केले जातील. सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपूर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी, असे समाज
कल्याण विभागाचे सहाक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.
