Latest Posts

भांदक रेल्वे परिसरात १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या : परिसरात खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : भांदक रेल्वे स्टेशन परिसरात आज पहाटे एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील विद्युत वाहिनी पोल क्रमांक ८५२ बी, ३४ एआय येथे ही घटना घडली.

मृत युवकाचे नाव दुर्गेश प्रसाद मसराम (१८) असे असून तो मूळचा ग्राम कोको, तहसील बिछिया, जिल्हा मंडला (मध्यप्रदेश) येथील रहिवासी होता. वर्धा–बल्लारशाहा रेल्वे लाईन व सायडिंगच्या कामासाठी तो आपल्या आई-वडिलांसोबत येथे मोलमजुरीसाठी आला होता. रेल्वे परिसरात झोपडीत कुटुंबासह त्याचे वास्तव्य होते.

आज पहाटे दुर्गेश घरात नसल्याचे आढळल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता तो रेल्वे लाईनजवळ दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

घटना रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने पुढील तपास जी आर पी वर्धा करत आहे.

Latest Posts

Don't Miss