विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे ही संस्था महाराष्ट्र राज्यतील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा – कुणबी या लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांकरिता सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली स्थापन करण्यात आलेली आहे.
या संस्थे मार्फत शेतकरी युवक/युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने केंद्रीय मधमाशी संशोधन, प्रशिक्षण संस्था, शिवाजीनगर पुणे व मध संचनालय, महाबळेश्वर सातारा या प्रशिक्षण संस्थे मार्फत मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण देण्यात येत असून, त्या करिता अर्ज मागविण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
विस्तृत माहिती सारथी च्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी केंद्रीय मधमाशी संशोधन यांचे संकेतस्थळ www.kvic.org.in, www.mskvib.org यावर माहिती उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील शेतकरी युवक, युवतीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीचे विभागीय कार्यालय नागपूर येथील उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी नागपूर (शहर) सुरेश बगळे यांनी केले आहे.
