विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वेनगर वार्ड परिसरात अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून देशी बनावटीची पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली असून आरोपी मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख (३०) याला अटक केले आहे.
बल्लारपूर पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नवाब शेख नावाचा इसम आपल्या घरात अवैध शस्त्र बाळगून असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी रेल्वेनगर वार्डातील घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता स्टोअर रूममधील बुटाच्या खोकेत पांढऱ्या चौकटा कापडात लपवलेली देशी बनावटीची ७ एमएम बोर पिस्तूल किंमत १० हजार रुपये तसेच दोन जिवंत काडतूस किंमत २ हजार रुपये मिळून आले. मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.
वअवैध अग्निशस्त्र व दारूगोळा बाळगल्याप्रकरणी आरोपीवर कलम ३,२५ भारतीय शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, शब्बीर पठाण, सफौ रणविजय ठाकुर, पोहवा सुनिल कामतकर, पुरुशोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोश दंडेवार, विकास जुमनाके, पो.अ. खंडेराव माने, शरदचंद्र कारुष, गुरु शिंदे यांनी केले.
दरम्यान, याच दिवशी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनेही स्वतंत्र कारवाई करत एक आरोपीला गावठी बंदुकीसह अटक केली, त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांनी अवैध शस्त्रधारकांविरुद्ध मोहीमच उघडली असल्याचे चित्र दिसत आहे.
