Latest Posts

पालकत्व योजनेकरीता अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : बालकांच्या देखरेख संस्थेत दाखल, अनाथ, निराधार, परित्यागीत, असक्षम पालकांचे बालक, ज्या बालकांना त्यांची पालके एक वर्षाहुन अधिक काळापासुन भेटायला आलेली नाही अशी भेट नसलेली बालकांना पालकत्व मिळावे यासाठी पालकत्व योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत  बालकांचे पालकत्व स्विकारन्यासाठी पालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक पालकांनी https://cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटूंब मिळावे हा बालकाचा अधिकार आहे. बाल न्याय अधिनियमातंर्गत प्रत्येक मुलाला घर मिळाले पाहिजे, कुटुंबात मुलांचे संगोपन व्हायला पाहिजे आणि अनाथालय, बालआश्रम, बालगृह, निरीक्षणगृह हे समाजातील दुर्लक्षीत आणि देखभालीची आवश्यक्ता असणाऱ्या बालकांसाठी शेवटचा पर्याय असायला पाहिजे हे कायद्याचे तत्त्व आहे. मात्र समाजातील अनेक बालके बेसहारा व निराश्रीत होऊन संस्थेत राहुन आपले जिवण जगत आहेत अशा बालकांना कौटुंबिक वातावरण मिळावे व त्यांचे बाल अधिकार सुरक्षित राहावे यासाठी पालकत्व योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी बालकांना त्यांचा जगण्याचा, सहभागाचा, सुरक्षितेचा, शिक्षणाचा व विकासाचा अधिकार देण्यास मदत करावी.

या करीता केंद्र शासनाने बालकाच्या काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत विधीसंघर्षग्रस्त बालक आणि काळजी च संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना यथासंभव त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवून पुनर्वसनाद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. या बालकांच्या पुनर्वसनाकरीता संस्था अंतर्गत आणि संस्था बाह्य अशा दोन प्रकारे सुविधा पुरवून त्यांचा सर्वाधिक विकास करायचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पुनर्वसन आणि सामाजिक पुनःस्थापना या प्रकरणांमध्ये बालकांना संस्थाबाह्य सेवा पुरविण्याकरीता तरतुद करण्यात आलेली आहे. इच्छुक कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.

इच्छुक पालकत्व स्विकारणारे अर्जदार हे शारिरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत, अर्जदारांना कोणतीही जीवघेणी वैद्यकिय स्थिती नसावी, कोणत्याही स्वरुपाच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये किंवा कथितरित्या दोषी नसावे, विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती असणे आवश्यक आहे. एकल महिला मुलगा किंवा मुलगी दोन्ही पैकी कोणाचीही निवड करु शकते. एकल पुरुष फक्त मुलाची निवड करु शकतो. अर्जदार हे प्रेमळ, काळजी घेणारे आणि मुलाच्या वाढीसाठी फायदेशीर असे कौटुंबिक वातावरण तयार करण्यासाठी वचनबध्द असणे गरजेचे आहे.

मुलांचे संगोपन करु इच्छुणाऱ्या पालकांनी https://cara.wed.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अनुसूची १ नुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

अल्पकालीन प्रायोजकत्वाचा कालावधी हा १ वर्षाचा असेल तर दिर्घ कालावधी हा १ वर्षापेक्षा जास्त आणि पालक कुटुंबाशी मुलाच्या सुसंगततेच्या मुल्यांकनाच्या आधारे बालक व बालिका वयाच्या १८ वर्षा पर्यंत ठेवता येईल.

प्रायोजकत्वची समाप्ती –

बाल कल्याण समिती, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजुरी समितीची शिफारस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अहवालावर विचार केल्यानंतर पालनपोषनाची नियुक्ती समाप्त करण्याचा अधिकार राहील.

कायमस्वरुपी दत्तक विधान –

अर्जदारांनी प्रतिपालकत्व योजनेअंतर्गत जर बालक, बालिका पालनपोषनासाठी घेतलेले असेल आणि पालकांच्या काळजीच्या कालावधीत मुलांचे पालनपोषन कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे जुळवुन घेतलेल्या प्रकरणांमध्ये आणि पालक कुटुंब आणि पालनपोषनासाठी असलेले बालक, बालिका दोघेही दोन वर्षाच्या कालावधीनंतर दत्तक घेण्यास पात्र असु शकतात.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, डॉ. अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरुम जवळ, नागपूर रोड, येथे ई-मेल आयडी – dwedowardha@gmail.com वर संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss