Latest Posts

तब्बल २२ वर्षापुर्वीच्या गुन्हयातील फरार आरोपीला भामरागड पोलीसांनी केले जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षल चळवळीचा बिमोड करण्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम पोलीसांना पार पाडावे लागते.

सन- २००२ मध्ये ०२ निरापराधांना अपघातामध्ये जीव गमवावा लागला होता. त्यातील आरोपी चमरु गोंगलु गोटा हा न्याय प्रक्रियेपासुन पळ काढुन स्वतःची ओळख बदलुन लपण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे मागील अनेक वर्षे तो पोलीसांच्या हाती लागत नव्हता. त्याचे पकड वॉरंट अहेरी न्यायालयाकडुन नव्याने प्राप्त होताच भामरागड पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार जयंत पुडो यांनी गुप्त बातमीदारांना सक्रिय करुन माहीती काढली असता तो गडचिरोली शहरामध्ये राहात असल्याची माहीती मिळाली. त्याबाबत खात्री करुन राहते परिसरातुन त्याला ताब्यात घेतले व अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.

याप्रमाणे न्यायप्रक्रियेत पाहिजे असणाऱ्या जुन्या गुन्हयातील पाहिजे असलेल्या विविध गुन्हयातील एकुण ८ आरोपींना भामरागड पोलीसांनी मागील काही कालावधीत पाखांजुर (छ.ग.) चंद्रपुर व गडचिरोली येथुन जेरबंद केले आहे.

सदर उल्लेखनिय कामगिरी भामरागड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयंत पुडो, पोलीस अंमदार रामेश्वर जवरे, पोलीस अंमलदार अमोल रासेकर यांनी पार पाडली आहे.

Latest Posts

Don't Miss