विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहेरी तर्फे अहेरी आगार प्रमुखाला ०१ जानेवारी २०२४ सोमवारला निवेदन देण्यात आले आणि यांच्यासह प्रत देवेंद्र फडणवीस पालकमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा पाठवण्यात आले.
सदर निवेदनात प्रामुख्याने बसेसची (नवीन) संख्या वाढवावी, चालक आणि वाहक व बस दुरुस्त करणारे कर्मचाऱ्यांच्या संख्या मध्ये वाढ. महाराष्ट्र शासनाकडून जवळपास ३० नवीन बस अहेरी आगार ला आलेले नाहीत व कधी पर्यंत येणार आहे. अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यातून अनेक विद्यार्थी या दुर्गम भागातून परीक्षा देण्यासाठी या भागातून दुसऱ्या भागात जातात. मात्र बस सेवा व्यवस्थित नसल्यामुळे खूप अडचण निर्माण होत आहे, हि बस सेवा नियमित सुरळीत करण्यात यावी. आगाराचे बसेस वेळेवर नसल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी परत घरी जाण्यासाठी उशीर होत आहे. (शांतीग्राम-लगाम, लगाम खमनचेरू-आलापल्ली-अहेरी, विवेकानंदपूर – मुलचेरा, जिमलगट्टा- गुड्डीगुडम-आल्लापल्ली, पेरमेल्ली आल्लापल्ली, इंदाराम- व्यंकटरावपेठा- अहेरी). आलापल्ली- चंद्रपूर या मार्गावरील जास्तीत जास्त विद्यार्थी हे आलापल्लीला शाळेत शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे या मार्गावरील बसेस नियमित चालू ठेवावी. अहेरी- नागपूर व इतर लांब मार्गाचे बसेस फलक लाऊन चंद्रपूर पर्यंत जातात व बस नादुरुस्त असल्याचे कारणे देऊन ते तिथेच थांबतात. यामुळे प्रवाश्यांची व विद्यार्थ्यांची खूप हैगैए होते व अनेक अडचणींचा सामना कराव लागते. इत्यादी मागण्या घेऊन निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न केल्यास अभाविप [ABVP] संपूर्ण विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी अहेरी जिल्हा संयोजक रोहित अविनाश श्रीरामवार, आलापल्ली नगर मंत्री रोहित मुक्कावार, अहेरी नगर सहमंत्री आयुष मामीडवार, महा. विद्यालय प्रमुख अजय सिलवेरी आणि कार्यकर्ते संजय तिम्मा, सुनील कुळमेते, करण मारशेट्टीवार यांची उपस्थिती होती.
