Latest Posts

अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : अग्निवीर भरती मेळावा विदर्भातील दहा जिल्ह्यासाठी (बुलढाणा वगळून) आयोजित करण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर आनंद पाथरकर, सेना मेडल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणी  प्रक्रिया १२ मार्च ते १०  एप्रिलपर्यंत सूरू असून सामान्य निवड परीक्षा मे व जून महिन्यात होणार आहे. उमेदवारांची भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जासह नोंदणी होणार असून ऑनलाईन नोंदणी वेळेच्या आत करुन घ्यावी.

Latest Posts

Don't Miss