Latest Posts

आधार कार्ड मोफत अपडेट करिता मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मंडळी आधार कार्ड संदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर तुम्ही ते मोफत अपडेट करू शकता. शासनाने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जी मुदत दिली होती, ती आता वाढवली आहे. १४ जून २०२५ पर्यंत तुम्ही आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता.

आधार कार्ड अपडेट करणे प्रत्येक १० वर्षांनी अनिवार्य आहे. जर तुम्ही आधार अपडेट केले नाही, तर तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. युआयडीएआयने १४ जून २०२५ पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ लाखो नागरिकांना मिळेल, आणि आधार अपडेट करण्याची प्रक्रिया देखील अधिक सुलभ होईल.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील –
१) युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा https://myaadhaar.uidai.gov.in/
२) आधार वर क्लिक करा आणि आधार अपडेट करा या पर्यायावर क्लिक करा.
३) तुमचे आधार डिटेल्स भरा आणि संबंधित कागदपत्रांसह अपडेट करा.
४) नंतर तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे लॉगिन करा.
५) जर तुम्हाला बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट, फोटो, मोबाईल नंबर) अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन हे अपडेट करावे लागेल. यासाठी शुल्क लागू शकते.

Latest Posts

Don't Miss