– अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी पर्यंत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा २३, २४ आणि २५ मे २०२५ रोजी घेण्यात येणार असून अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. चलनाने बॅंकेमध्ये शुल्क भरावयाची मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत आहे.
परिक्षार्थींकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. परिक्षार्थींसाठी ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या खात्याच्या संकेत स्थळावर स्वत:चा यूजर आयडी व पासवर्ड तयार करून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करता येईल.
परीक्षेकरिता लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे अर्जासाठी तपशील परीक्षा शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसुचना https:sahakarayukta.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर महत्वाचे दुवे जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ येथे उपलब्ध आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुष्पक सारडा यांनी कळविले आहे.
