Latest Posts

२०१९ पूर्वीच्या जून्या वाहनांना अति सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

 – प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : वाहनांवर असलेल्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणाऱ्या गुन्ह्यांना कमी करण्यासाठी २०१९ पूर्वीच्या जून्या वाहनांना अति सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे या नवीन अति सुरक्षा नोंदणी  प्लेटमुळे सोपे झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जून्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अनिवार्य असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये  कळविले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सदर नंबर प्लेट बसविणाऱ्या एजंसीची झोन निहाय अधिकृत केंद्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही यादी देण्यात आली आहे. याचबरोबर वाहनाप्रमाणे नंबरप्लेट तयार करुन ती बसविण्यासह एकत्रित खर्च वाहन प्रकारानिहाय निश्चित करुन दिला आहे. दुचाकी वाहन व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये अधिक जीएसटी, तीनचाकी वाहनासाठी ५० रुपये अधिक जीएसटी व उर्वरित सर्व वाहन प्रकारासाठी ७४५ रुपये अधिक जीएसटी एवढा खर्च येईल. एजंसीकडूनकाही अडचणी आल्यास अथवा त्यांनी अशा नंबरप्लेट बसवून देण्यासंदर्भात कुणाच्या तक्रारी असतील तर संबंधित सेवा पुरवठादाराच्या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे विजय चव्हाण यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss