Latest Posts

२० फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगार व स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा आणि स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११.०० ते दुपारी. २.०० यावेळेत स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय भंडारा ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील खालील प्रमाणे नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून ६१८ पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार असून जिल्हायातील नोकरी इच्छुक व गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारआहेत.

या मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत शैक्षणिक कागद पत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटो सह मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. नोकरी इच्छुक युवक व युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा. महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज होत नसल्यास खालील लिंक ओपन करून गुगल फॉर्म भरुन अर्ज करावा किंवा क्यूआर कोड स्कॅन करून गुगलफॉर्म द्वारे ऑनलाईन सादर करावा.

या रोजगार मेळावामधील रोजगाराच्या सुवर्ण संधीचा जिल्हयातील बेरोजगार युवक-युवतीना लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी कळविले आहे. याबाबत काही अडचण/ शंका असल्यास कार्यालयाच्या  ०७१८४-२५२२५० या दुरध्वनी क्रमांका वर संपर्क साधावा.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करून गुगलफॉर्म भरावा.

Latest Posts

Don't Miss