Latest Posts

देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६ लाख रुपयांचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज (Desaiganj) : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे आदेशान्वये पोस्टे देसाईगंज हद्यीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकुण किंमत १६ लाख रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल २७ डिसेंबर २०२३ रोजी नष्ट करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल २७ डिसेंबर २०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल नष्ट करण्यात आला.

यामध्ये १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६ हजार ९५० बाटल्या, २) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या, ५) ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे कॅन असे एकुण ३७ हजार ९९४ बाटलाचे मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० X १० चा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. तसेच खड्डा पूर्ववत बुजविण्यात आला.  सदर मुधेमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी किरण रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.

Latest Posts

Don't Miss