Latest Posts

शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा : धानोरा तालुक्यातील घटना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : धानोरा तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ७७ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर २९ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाल्याने खाटा अपुऱ्या पडल्या आणि आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडाली.

तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटरवरील सोडे गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात.

सध्या येथे ३९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३७९ विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. दरम्यान, बुधवारी ३५८ विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण-भात व गाजरी देण्यात आल्या. जेवणानंतर अर्ध्या तासांनी काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ, असा त्रास जाणवू लागला. पाहता-पाहता ही संख्या १०६ वर पोहोचली. शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच खालावल्याने २९ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

Latest Posts

Don't Miss