विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट – ब ( अराजपत्रित) संयो संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ चे आयोजन ०२ फेब्रुवारी २०२५ (रविवार) रोजी करण्यात आले आहे. याआधी ०७ जानेवारी २०२५ रोजी होणारी ही परीक्षा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. पारसा
भंडारा जिल्ह्यातील २६४९ उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असून, त्यांना १० परीक्षा केंद्रांवर परीक्षा द्यायी लागणार आहे. परीक्षा सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत घेतली जाणार आहे आणि ती बहुपर्यायी स्वरूपात असेल.
परीक्षा केंद्र आणि उमेदवार संख्या –
भंडारा जिल्ह्यात परीक्षा घेण्यासाठी एकूण १० परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रमुख महाविद्यालये व शाळांचा समावेश आहे. सर्वाधिक ४५६ उमेदवार लिटिल स्टार, कान्हाळा, भंडारा या केंद्रावर परीक्षेला बसणार आहेत. तसेच शासकीय तंत्रनिकेतन, मराठी विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जगन्नाथदास कन्या विद्यालय, सेंट जोसेफ स्कूल यांसारख्या केंद्रांवर प्रत्येकी २४० ते २८८ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षा संचालनासाठी ४२४ कर्मचारी नेमले जाणार –
या परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी एकूण ४२४ कर्मचारी तैनात असतील. यामध्ये मुख्य पर्यवेक्षक, उपपर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, लिपीक, सहाय्यक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रांवर सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी गृहरक्षक दलाची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना –
उमेदवारांनी प्रवेशपत्र व ओळखपत्र सोवत आणणे बंधनकारक आहे.
परीक्षा केंद्रावर वेळेआधी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
मोबाईल, स्मार्टवॉच, संगणकीय उपकरणे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा हॉलमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षेतील कोणत्याही गैरप्रकारास सामोरे गेलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल.
भंडारा जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून परीक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
