विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत भंडारा व गोंदिया जिल्हयातील जागतिक व्याघ्र दिनानिमित्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धा, रिल स्पर्धा, संशेाधन चर्चा पोस्टर सादरीकरण होणार आहेत.
त्याअनुषंगाने स्पर्धेमध्ये सहभाग होण्याकरिता भंडारा व गोंदिया जिल्हयातील आवेदकाकडून १६ जुलै, २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून ते २२ जुलै, २०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आवेदन स्विकारण्यात येतील. तरी प्रशासनाच्या सोईकरिता प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्याकरीता सदर आवेदन फार्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत वरिल तिन्ही स्पर्धेचे QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत असून स्पर्धेकांनी सदर QR कोड स्कॅन करुन विशेष माहिती उपलब्ध करुन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी.
इच्छुकांनी जागतिक व्याघ्र दिनानिमित्य विविध कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भंडारा- गोंदिया जिल्हयातील सर्व इच्छुकांनी याबाबत नोंद घ्यावी, तसेच विशेष माहिती करीता www.nawegsonnazira.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.
