Latest Posts

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधुन विभागातुन/जिल्ह्यातुन/ तालुक्यातुन/शाळेतुन/कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार सन २००३-०४ या शैक्षणिक वर्षापासून देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील कार्यरत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी त्यांच्या शाळेतुन/कनिष्ठ महाविद्यालयातुन सन २०२५-२०२६ या सत्रातील फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास तात्काळ सादर करावे. सदर योजनेच्या अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा या कार्यालयास त्वरित संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी केले आहे.

पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी पुरस्काराची रक्कम पुढीलप्रमाणे : विभागातुन प्रथम- ५० हजार रुपये, जिल्ह्यातुन प्रथम- २५ हजार रुपये, तालुक्यातुन प्रथम- १० हजार रुपये, शाळेतुन/कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम- ५ हजार रुपये.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक ०७१८४-२५२६०८ किंवा ई-मेल acswobhandara@gmail.com यावर संपर्क साधावा. असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, भंडारा यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss