विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : शेतकरी दाम्पत्य शेतात जात असताना जंगली डुकरानी त्यांच्यावर हल्ला केला. यात पती पत्नी दोघेही जखमी झाल्याची घटना २३ जुलै मंगळवारी सकाळच्या सुमारास कढोली येथे घडली.
प्रफुल ताराचंद सिडाम (३८) व कविता प्रफुल सिडाम (३५) रा. कढोली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे जंगली डुकरांच्या हल्ल्यात जखमी पती पत्नीचे नाव आहे.
माहितीनुसार, प्रफुल व त्याची पत्नी दोघे आपल्या शेताकडे जाताना जंगली डुकरानी त्यांच्यावर हल्ला केला व फरफटत नेले. त्या दोघांनी जंगली डुकराविरूद्ध प्रतिकार केला व त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटले. यात ते जखमी झाले असुन आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कढोली गावात जंगली डुकरांचा मोठया प्रमाणात हैदोस सुरू असून जखमीना वनविभागाकडून त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
