Latest Posts

रेल्वे चौकात वेटर व बार मालकाला मारहाण बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (बल्लारपूर) : शहरातील रेल्वे चौक परिसरात किरकोळ वादातून वेटर आणि बार मालकावर चार तरुणांनी लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आदर्श अजित गलगट (२२) , रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारपूर) यांनी बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १ वाजता आदर्श गलगट हा आपल्या मित्र कृष्णा मेकला (२५) याच्यासह मोटारसायकलने रेल्वे चौकात चहा पिण्यास गेला होता. दरम्यान, दिलीप टॉकीजजवळ ते मजेत बोलत असताना तेथे उपस्थित असलेल्या निर्भय नावाच्या युवकाने गैरसमजुतीतून आदर्शच्या गालावर चापट मारत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर रेल्वे चौकात पुन्हा भेट झाल्यावर निर्भयने पुन्हा शिवीगाळ केली. त्यामुळे आदर्शने आपल्या बार मालक संघर्ष ढोके यांना घटनास्थळी बोलावले. संघर्ष ढोके यांनी निर्भयला कारण विचारल्यावर त्याने फोन करून आपल्या मित्रांना बोलावले. काही वेळातच तिघे अनोळखी युवक गाडीने तेथे आले आणि त्यांनी काहीही न ऐकता आदर्श गलगट व संघर्ष ढोके या दोघांवर लाथाबुक्यांनी, चप्पलने, काठीने आणि दगडाने हल्ला केला.

या हल्ल्यात आदर्श गलगट याच्या डाव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली, तर संघर्ष ढोके यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला व चेहऱ्याला मार लागल्याने रक्तस्राव झाला. घटनेनंतर दोघेही घाबरून थेट बल्लारपूर पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली.

आदर्श गलगट यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्यांची नावे नवाब, मुकदर आणि फैजान अशी असून ते निर्भयचे मित्र आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला आहे.

बल्लारपूर पोलीसांनी आरोपी विरुध्द अप. क्रं ८३४/२५ कलम ३५२,३५१ (२), ३ (५), ११८ (१), ११५ (२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Latest Posts

Don't Miss