विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृती साठी पत्रलेखन, जनजागृती रॅली, विविध स्पर्धा, पथनाट्य विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ७०% च्या पुढे नेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती करिता, स्वीप टीमच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी फलक लावण्यात आले.
यामध्ये वर्धा बस स्टॅन्ड, वर्धा रेल्वे स्टेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया वर्धा येथे हे फलक लावण्यात आले. वर्धा बस स्टॅन्ड च्या अधिकाऱ्यांसोबत व रेल्वे स्टेशन च्या स्टेशन मास्टर व स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून, व त्यांना मतदाना संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली. व त्याचे महत्त्व त्यांना सांगण्यात आले. या अधिकाऱ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला व मतदान जनजागृती साक्षरता फलकाकरिता उत्तम असे प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा योग्यरीत्या प्रसार करून जनजागृती करण्याकरिता आपले हातभार लावू असे SVEEP नोडल अधिकारी डॉ. मंगेश घोगरे व त्यांच्या संपूर्ण पथकाला बसस्टँड, रेल्वे स्टेशन व बँकेच्या अधिकाऱ्यानी आश्वासन दिले. सदर उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी स्वीप नोडल अधिकारी डॉ मंगेश घोगरे, सहायक नोडल अधिकारी उत्तम खरात, तसेच वैभव तिवारी व मयंक बागडे यांनी प्रयत्न केले .
