Latest Posts

विरली (खुर्द) येथील ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): ९ नोव्हेंबर रोजी, तालुक्यातील विरली (खुर्द) गावात एका ३५ वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह घरासमोर आढळला. मृतक बुद्धिमान धनविजय (रा. विरली खुर्द) असे त्याचे नाव असून, याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि पोलिस तपास सुरू आहे.

घटनास्थळी मृतकाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळल्याने, मृत्यू हत्येमुळे झाला का, की तो नैसर्गिक होता, यावर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गावात ८ नोव्हेंबर रोजी बुद्धिमानला मारहाण केल्याची चर्चाही आहे. त्यानंतर थंडीत रात्री बाहेर झोपून त्याचा मृत्यू झाला, अशी अटकळ गावकऱ्यांनी लावली आहे. या चर्चेच्या आधारावर पोलिस तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.

घटनेची माहिती एका गावकऱ्याने पोलिसांना दिली, आणि तत्काळ साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतकाच्या मामाने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास चालू आहे.

Latest Posts

Don't Miss